विवस्त्रा  लेस्ली नेका अरीमा ११ ऑगस्ट २०२०

संपूर्ण अनावृत्त असलेल्या त्या स्त्रीच्या ओटीपोटाखालचे केस नीट कापून व मेणाचा वापर करून आकार दिल्याने तो भाग अस्ताला चाललेल्या सूर्यासारखा दिसत होता. ती स्त्री सौंदर्य प्रसाधने आणि मलमांचे नमुने, त्यांचे फायदे दिसावेत अशा रीतीने मांडत असताना, कपडे परिधान केलेल्या स्त्रिया तिच्याकडे तुच्छतेने पाहात होत्या. "त्वचा कशी मृदू व मुलायम होते, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहात आहातच", ती स्त्री डोळे मिचकावत म्हणा…